नाशिक : या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला आहे. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली आहे. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा भाव पार नगण्य मिळू लागल्याचे अनुभव बाजार समिती येऊ लागले आहेत. दरम्यान, कांदा विकून मिळणाऱ्या रकमेतून साधा उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संतापलेले शेतकरी निरनिराळे हातखंडे अवलंबताना दिसत आहेत.

दरम्यान, हा कांदा मोदींना पाठविण्यापूर्वी या शेतकऱ्याने त्याच्या ट्रक्टरवर ‘शेतकरी, व्यापारी बंधूंनो, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती फार कठीण असून, त्याकडे कोणीही गांभीर्याने पहात नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथा पंतप्रधानांना कालव्यात या उद्देशाने मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे ऑनलाईन मनीऑर्डरने पंतप्रधानांना पाठविणार आहे. मी कोणत्याही राजकीय हेतूने हे करत नसून केवळ मोदींना शेतकऱ्यांच्या व्यथा कालव्यात या हेतूने हाच माझा उद्देश आहे’ असा मजकूर लिहिला होता.

Famer angry over rates received for onion so he sent whole amount to narendra modi through money order