25 September 2020 12:17 AM
अँप डाउनलोड

'मोदीमुक्त भारत', प्रचंड सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई : भारताला १९४७ साली पाहिलं स्वातंत्र मिळालं आणि दुसरं १९७७ साली. परंतु आता भारताला मोदींच्या हुकूमशाहीतून मुक्त होण्यासाठी २०१९ ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला प्रलोभन दाखवून फसवणाऱ्या मोदींना २०१९ मध्ये सत्तेतून खाली खेचण्यासाठी ‘मोदीमुक्त भारत’ झालाच पाहिजे असे आव्हाहन त्यांनी संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मोदीमुक्त भारत करण्यासाठी आणि भारताला मोदींच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी २०१९ ला सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आव्हाहन सुद्धा राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील प्रचंड सभेत केलं. शिवतीर्थवरील प्रचंड सभेला संबोधित करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार वर तूफान टीका केली. मोदींनी देशातील जनतेला मोठं मोठी प्रलोभन दाखवून फसवलं आहे आणि दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व प्रश्न संपले असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री गाणी गात आहेत अशी टीका त्यांनी रिव्हर थीम साँग मधील मुख्यमंत्र्यांच्या आणि अर्थमंत्र्यांच्या अभिनयाचा उल्लेख करून केली. तर मुनगंटीवार यांच्या अभिनयाची त्यांनी थेट शाळेतील सांबा अशीच केली, तर मुख्यमंत्री म्हणजे हे केवळ वर्गातील मॉनिटर आहेत जे शिक्षकांचे आवडते पण विद्यार्थ्यांचे नावडते आहेत.

पीएनबी महाघोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणावरून जनतेचं लक्ष हटाव म्हणून जाणीवपूर्वक श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या दाखवण्यात आल्या. देशासाठी श्रीदेवीने असं काय केलं होत म्हणून तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला होता असा खडा सवाल ही त्यांनी सरकारला केला.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल्सच स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेण्यात आलं आहे. लोकशाहीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सुद्धा राज ठाकरे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. माध्यमांमध्ये सरकारविराधी बातम्याच येत नाही आणि आल्याचं तर काही फुटकळ बातम्या दाखवल्या जातात जेणेकरून संशय येऊ नये म्हणून अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली.

मोदी सरकार देशात आल्यानंतर मोदी-शहा यांच्या सांगण्यावरूनच अनेक संपादकांना, पत्रकारांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे असा गंभीर आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी प्रचंड जनसमुदायासमोर केला. श्रीदेवीच्या मृत्यूच्या ज्या बातम्या माध्यमांवर झळकत होत्या त्यात त्याच्या मृत्यू मागे दारू हे सुद्धा एक कारण होतं आणि महत्वाचं म्हणजे माध्यमांना श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या दाखविण्यासाठी साठी वेळ आहे, परंतु न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी दाखवायला वेळ नाही असं सांगून माध्यमांच्या मानसिकतेवर सुद्धा अचूक बोट ठेवलं.

बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार हा भारतीय नसून तो कॅनेडियन नागरिक आहे आणि त्याने नुकतेच प्रदर्शित केलेले सिनेमे हे सरकार पुरस्कृत होते असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला. अक्षय कुमार हा कलाकार म्हणून चांगला आहे पण तो सध्या सरकार पुरस्कृत सिनेमांमध्येच काम करतोय असं ही राज ठाकरे म्हणाले. पुढे नोटबंदी संबधी बोलताना त्यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली की, नोटबंदी हा १९४७ नंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि मोदी सरकार जर पुन्हा सत्तेत आले तर देशातील परिस्थिती अजून बिघडेल असा घाणाघातही मनसे प्रमुखांनी केला.

राम मंदिराबाबत बोलताना रोज ठाकरे असं म्हणाले की अयोध्येत राम मंदिर हे झालाच पाहिजे, परंतु विकासाची स्वप्न देशवासियांना दाखवून सत्तेत आलेलं मोदी सरकार हे विकास, बेरोजगारी या विषयांवर अक्षरशा नापास झालं आहे म्हणून अखेर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिराच्या नावाने देशात पुन्हा हिंदू मुसलमान दंगली घडविण्याच्या योजना मोदीसरकार करत असल्याच्या गंभीर आरोप राज ठाकरे यांनीं केला. राम मंदिर हे झालंच पाहिजे परंतु ते निवडणूका झाल्या आणि राम मंदिर हे भाजपने स्वतःच्या राजकारणासाठी वापरू नये असं ही राज ठाकरे म्हणाले.

एकूणच सभेला असलेली प्रचंड गर्दी आणि देशातील सर्व माध्यमाचे सभेवर स्थिरावलेले कॅमेरे पाहता राज ठाकरे यांनी शिवतीर्थ गाजवलं असच म्हणावं लागेल. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण देशात मोदी आणि अमित शहांबद्दल बोलण्याची हिम्मत कोणी ही करू शकत नाहीत ते राज ठाकरे प्रचंड सभेत अगदी छाती ठोक पने आणि पुरावे देऊन करत आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x