25 April 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे

Corona infection

मुंबई, १६ एप्रिल: कोरोनाची दुसरी लाट भारतात जीवघेणी ठरत आहे. काल म्हणजे 15 एप्रिलला देशात सर्वाधिक मृत्यू झाले. ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. नव्या माहितीनुसार कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर आता अवघ्या 1 मिनिटाच्या आत कोरोनाची बाधा होते. आता तर कोरोनाची नवी लक्षणे समोर येत आहेत.

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या दुसऱ्या लाटेतील चिंतेची बाब म्हणजे, यात लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका जाणवत आहे. सध्या जगभर लसीकरण सुरू आहे, पण ही लस लहान मुलांना दिली जात नाहीये. त्यामुळेच, जगभरातील लहान मुलांसाठी व्हॅक्सीनची गरज भासत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका उद्धभवला नाही. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे विषाणूचा त्यांच्यावर जास्त परिणाम झाला नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही कोरोनाचा धोका जाणवत आहे. आता दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. आता सापडणाऱ्या रुग्णांपैकी दर 20वा रुग्ण लहान मुलगा आहे. एकूण रुग्णांपैकी 10 % रुग्ण हे 11 ते 19 वयोगटातील आहेत. यामुळे आता मुलांच्या सुरक्षेने पालकांच्या मनात घर केले आहे.

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने सांगितल्यानुसार, कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 4.42 टक्के रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर, 9.78 टक्के रुग्ण 11 ते 20 वयोगटातील आहेत. जानकार सांगतात की, मुले आधी अॅसिम्टोमॅटिक होते, पण त्यांच्यात अनेक लक्षणे दिसत होती. जसे- नाक बंद, पोटदुखी, घशात दुखणे इत्यादी. लहान मुलांच्या लसीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

News English Summary: Now every day shocking statistics are coming out. Every 20th patient found now is a child. 10% of the total patients are in the age group of 11 to 19 years. This has now made the safety of the children a home in the minds of the parents. According to the National Center for Disease Control, 4.42 percent of corona patients are under 10 years of age.

News English Title: Corona infection increasing in children’s According to the National Center for Disease Control research news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x