कोलंबो : श्रीलंकेतील टी-२० तिरंगी मालिकेत अंतिम सामन्यात भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने मारलेल्या षटकाराने टी-२० तिरंगी मालिका खिशात तर घातलीच पण बांगलादेशची नागीण डान्सची संधी सुद्धा हुकली आहे. दिनेशने ८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार लगावून भारताला विजय मिळवून दिला.
अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात संपूर्ण श्रीलंकन सपोर्टर्स हे भारताचे सपोर्टर्स झाले होते. कारण होतं श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भर मैदानात केलेला नागीण डान्स ज्यामुळे श्रीलंकन सपोर्टर्स हे पूर्णपणे भारतीय टीमचे सपोर्टर्स झाले होते.
प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशनं भारता समोर १६७ धावांचे लक्ष ठेवले होते. भारताची सुरवात चांगली झाली नसल्याने विजय मिळवणं सहज राहील नव्हतं. रोहित शर्माने झुंजार खेळी करत भारतासाठी ५६ धावांची खेळी केली. परंतु रोहित शर्मा आणि लोकेश राहुल बाद झाल्यावर भारतीय टीम मालिका गमावते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आणि ८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार त्यातील शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने षटकार मारून भारताला विजय तर मिळवून दिलाच पण बांग्लादेशची नागीण डान्सची संधी मात्र हुकली आहे.
