19 August 2022 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार
x

Benefits of Bath at Night | रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे - नक्की वाचा

Health benefits of bath at night

मुंबई, २३ ऑगस्ट | अनेक लोकांना दिवसा आंघोळ करण्यापेक्षा रात्री आंघोळ करायला आवडते. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि ताण कमी होतो. रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. चल तर मग जाणून घेवुया रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे.

रात्री आंघोळ करण्याचे जबरदस्त फायदे (Health benefits of taking a bath at night in Marathi) :

चांगली झोप येते:
रात्री आंघोळ केल्याने शरीर आणि मेंदू शांत होतो. यामुळे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत मिळते. झोपण्यापूर्वी एक तासआधी कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे आपल्याला लवकर झोप येते. याचे कारण म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे तापमान कमी होते यामुळे चांगली झोप येण्यास मदत मिळते.

त्वचेमध्ये चमक येते:
तुम्हाला जर पिंपल्सची समस्या असेल तर झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केल्यास चेहऱ्यावरील पीपल्स कमी होण्यास मदत मिळते. तसेच त्वचा कोरडी आणि निर्जीव पडत नाही. थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा चमकदार होते.

पावसाळ्यातील संसर्गापासून बचाव होतो: 
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने दिवसभर शरीरावर बसलेले जिवाणू कमी होतात. पावसाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही झोपण्यापूर्वी नियमितपणे आंघोळ केली तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

केसांचे आरोग्य उत्तम राहते: (Health benefits of shower at night)

झोपण्यापूर्वी केस धुतल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते. केस लांब आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. तसेच रात्री केस धुतळल्याने केस चांगल्या पद्धतीने वाळवता येतात.

घामापासून मुक्ती:
सकाळी आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. परंतु रात्री आंघोळ केल्याने दिवसभरातील थकवा कमी होण्यास मदत मिळते. तसेच शरीराचा दुर्गंध कमी होण्यास मदत मिळते. यामुळे नियमितपणे झोपण्यापूर्वी आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायी असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of taking a bath at night in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x