9 August 2022 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold ETF Benefits | पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग, त्याचे फायदे आणि युनिट कसे खरेदी करावे जाणून घ्या Horoscope Today | 10 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा Motorola G32 Smartphone | मोटोरोला G32 स्मार्टफोन लाँच, 50 एमपी कॅमेरा, किंमत आणि बरंच काही जाणून घ्या Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही Jhujjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांचा आवडता मल्टीबॅगर स्टॉक, या स्टॉकने 30 महिन्यांत दिला 881 टक्के परतावा
x

मोठी संधी | गॅस सिलेंडर एजन्सी घ्यायची आहे? | वाचा अर्ज करण्याची प्रक्रिया

Gas cylinder agency

मुंबई, १९ जून | आगामी दोन वर्षांत 5 हजार नवे गॅस वितरक नियुक्त करण्याची देशातील सरकारी तेल कंपन्यांची योजना आहे. सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच 2 हजार नवे परवाने जारी केले आहेत. जर गॅस एजन्सी मिळवण्यासाठी आपणही इच्छुक असाल तर त्यासाठीची पूर्ण तयारी आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला नियम, अटी आणि शर्थी, प्रक्रियेची माहिती असणे महत्वाचे गरजेचे आहे.

गॅस वितरण परवाना मिळाल्यानंतर एजन्सी चालू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यात इतर स्थानिक मंजुऱ्यांसोबतच ऑफिस आणि गोडाऊनचाही समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्रातून हे नवे वितरक विशेष करून निवडले जाणार आहेत. कारण गॅस वापरणाऱ्यांची संख्या या राज्यांत सर्वाधिक आहे.

कठोर नियम आणि अटी एलपीजी डीलरशिप मिळवण्यासाठी असल्यामुळे डीलरशिप मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची पूर्ण तयारी करावी लागणार आहे. देशातील तिन्ही तेल कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस वेळोवेळी नव्या डीलरशिपसाठी जाहिरात देत असतात. तसेच गॅस वितरणाचे जाळे ग्रामीण भागात आणखी सशक्त करण्यासठी केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण एलपीजी डिस्ट्रिब्युशन योजनेंतर्गत (आरजीजीएलव्ही)आमंत्रण दिले जाते.

यात गॅस कंपन्या एजन्सी, गोडाऊनच्या जमिनीसाठी कंपन्यांचा वॉर्ड, विभाग किंवा निश्चित स्थान जाहिरातीच्या माध्यमातून सांगतात. उमेदवाराची अर्ज केल्यानंतर मुलाखत घेतली जाते. उमेदवाराला मुलाखतीनंतर वेगवेगळ्या आधारावर नंबर दिले जातात. नोटीस बोर्डावर पॅरामीटर्समधून मिळालेल्या नंबराच्या आधारवर याचा निकाल लावला जातो. त्यानंतर गॅस कंपनीचे एक पॅनल निवडण्यात आलेल्या उमेदवाराच्या जमिनीपासून सर्व गोष्टीची पडताळणी करते. त्यानंतर गॅस एजन्सी त्या उमेदवाराला वितरित करण्यात येते.

वास्तव्याचा पुरावा आणि जमिनीसंदर्भात माहिती गॅस एजन्सी मिळवण्यासाठी द्यावी लागते. उमेदवाराजवळ कायमचा निवासी पत्ता असायला हवा. तसेच गॅस एजन्सीचे ऑफिस आणि गोडाऊनसाठी पर्याप्त जमीनही असायला पाहिजे. तसेच उमेदवाराने 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच वयाची 21 वर्षं झालेली असली पाहिजेत. बँक बॅलन्स आणि डिपॉझिटचीही राशीची असण्याचीही आवश्यकता आहे.

अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, सशस्त्र बल, पोलीस या सरकारी कर्मचाऱ्यांनाही यातही आरक्षण दिले जाते. आपल्याला गॅस एजन्सी मिळवण्यासाठी जमीन आणि सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ असणे आवश्यक आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Process how to apply for gas cylinder agency news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x