23 September 2021 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Special Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी

Moong Daal Pakoda recipe

मुंबई, २६ जुलै | पावसाळा सुरु झालाय. पावसाळ्याच्या सरींची चाहूल सुरु झालीय. हवेत सकाळी आणि रात्रीही छान गारवा सुटतो. अशावेळी गरमागरम मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मुगाची डाळ पचायला हलकी असते, म्हणून चणाडाळ न खाणार्‍या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. ह्याच मिश्रणात पालेभाज्या कापुनही मिक्स करता येतात. चला तर मग त्याची रेसिपी जाणून घेऊयात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संपूर्ण साहित्य:
* १ वाटी मुगडाळ
* १ मोठा कांदा
* १ चमचा आल्-लसुण पेस्ट
* १ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
* २ चिमुट हिंग
* अर्धा चमचा हळद
* अर्धा चमचा गोडा मसाला (ऑप्शनल)
* तळण्यास तेल
* चवीनुसार मीठ

संपूर्ण कृती:
* मुगाची डाळ ४-५ तास भिजत ठेवा. नंतर धुवून पाणी निथळवून ती मिक्सरमधून वाटून घ्या. वाटताना पाणी आजिबात घालू नका.
* आता वरील जिन्नसात तेल सोडून सगळ वाटलेल्या डाळीत एकजीव करा.
* कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. चांगले तापले की त्यात चमच्याने छोट्या छोट्या भज्या टाका. दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
* चांगल्या खरपूस झाल्या की सर्व्ह करा. सॉस, चटणीसोबत त्याची टेस्ट चाखा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Moong Daal Pakoda recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(150)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x