23 September 2021 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

कोट्यवधीचा मोबाईल घोटाळा | अंगणवाडी सेविकांना निकृष्ट दर्जाचे मोबाईल | पंकजांची चौकशी करा - अंगणवाडी सेविका

Pankaja Munde

पुणे, २३ ऑगस्ट | राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना भाजपा सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी सोमवारी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी मोबाईल परत करत आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकार्‍यांना देऊन टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली. तसेच यावेळी भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अंगणवाडी महिला सेविकांना पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे,  मोबाईल घोटाळ्याच्या चौकशीची मागणी (Agitation of Anganwadi workers demanding inquiry against Pankaja Munde over mobile scam) :

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला:
अंगणवाडी सेविकांना तत्कालीन भाजपा सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागामार्फत १ लाख ५ हजार महिलांना मोबाईल वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून आज अखेर किमान ५० टक्के महिलांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. त्याचा येणारा खर्च संबधित महिलांना करावा लागत आहे. तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते अशी माहिती समोर आली आहे आणि तेच मोबाईल आम्हाला देण्यात आले आहे. या मोबाईल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या सर्व प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.

अधिकार्‍यांना मोबाईल देऊन निषेध: (Mobile scam during Pankaja Munde was minister?)

आमच्या महिलांना पगाराच्या निम्म्याहून अधिक खर्च मोबाईल आणि कागदपत्रा करता होतो. तो आम्हाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही हवेलीमधील २५० मोबाईल अधिकार्‍यांना देऊन निषेध व्यक्त करत आहोत. आता या सरकारने आम्हाला उत्तम दर्जाचे मोबाईल आणि त्यामध्ये मराठीमध्ये अॅप द्यावे अशी मागणीही शुभा शमीम यांनी यावेळी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Agitation of Anganwadi workers demanding inquiry against Pankaja Munde over mobile scam.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x