18 September 2021 9:39 PM
अँप डाउनलोड

राहुल गांधी म्हणतात, मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव

नवी दिल्ली : सध्या नवी दिल्लीत काँग्रेसच राष्ट्रीय महाअधिवेशन भरल आहे. त्यावेळीच पक्षाचा कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी नीरव मोदी आणि ललित मोदीचा दाखल देत नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली. ते म्हणाले की, मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालं आहे. सत्ताधारी भाजप केवळ आरएसएस म्हणजे संघाचा आवाज असल्याचा आरोप त्यांनी मोदीसरकार वर निशाणा साधत केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मोदीसरकाराने ने अमित शहा यांच्या मुलाला गडगंज केलं आणि नीरव मोदी व ललित मोदी सारख्यांच भलं केलं. परंतु देशातला सामान्य माणूस हा त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केला आहे असा घणाघात त्यांनी मोदी सरकारवर केला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला असून त्यांच्या मुलीनेच नीरव मोदीला मदत केल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाअधिवेशनात केला. काँग्रेस मधील नेते आणि तरुण कार्यकर्त्यांमधील भिंतींना सुद्धा छेद देण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेस पक्षामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा संदेशही त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.

मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याचा दाखल देताना तिथल्या विद्यमान शिवराज सिंग सरकारवर सुद्धा सडकून टीका केली. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर तरुणांना रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देऊ असे ही ते म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणाला सुद्धा घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस हा केवळ एका धर्माला मानणारा पक्ष नसून सर्वच धर्माचा आदर करणारा पक्ष आहे आणि जर देशाला विजयपथावर घेऊन जायचे असेल तर सर्वच धर्मांना एकत्र घेऊन देशाला पुढे घेऊन जावे लागेल. देशात २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी महाअधिवेशनाच्या समारोपावेळी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)#Rahul Gandhi(236)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x