20 June 2021 4:15 PM
अँप डाउनलोड

Special Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं

yummy varanphal

मुंबई ५ मे : वरणफळं हा बनवायला अतिशय सोप्पा पदार्थ आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यास आपण ते एक वेळेचं जेवण म्हणूनही बनवू शकतो. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

साहित्य :
१ वाटी तूरडाळ,
१ १/२ वाटी पोळ्यांची कणिक
१ १/२ छोटे चमचे हळद ,
२ छोटे चमचे लाल तिखट ,
२ चमचे बेसन,
सुपारीएवढी चिंच
लिंबाएवढा गूळ,
फोडणीचे साहित्य

कृती: डाळ शिजवून घ्यावी. कणिक पोळ्यांसाठी मळतो तशी मळावी . मळताना त्यांत बेसन घालावे तेल मोहरी हळद चिमूटभर हिंग अशी फोडणी करुन त्यात शिजलेली डाळ,हळद,तिखट ,पाणी घालून थोडे चिंच गूळ आणि मीठ घालावे. हे मिश्रण पातळ ठेवून मंद आचेवर उकळत ठेवावे. आता कणकेची पोळी लाटून तिचे कातणीने शंकरपाळ्याप्रमाणे तुकडे करावेत. २-३ पोळ्या लाटून तुकडे करुन झाल्यावर हे तुकडे सुटे करुन वरणात घालावे. वरणातले पाणी आटले असल्यास परत थोडे पाणी घालून ढवळावे. ५-१० मिनीटे शिजू द्यावे आणि उतरवावे.

News English Summary: Varanphal dish is a very easy to make. If you have less time, you can make it as a one-time meal. Its materials and actions are as follows.

News English Title: Yummy and tasty Varanphal news update article.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x