15 December 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

पंढरपूर अवैध सावकरी | भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षाच्या घरावर सहाय्यक निबंधकांची धाड

Police raid, BJP Pandharpur, Yuva Morcha, Adhatrao

मुंबई, ०६ मार्च: भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली आहे. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

स्थानिक पोलिसांच्या कारवाईत अधवटराव यांच्या घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अधवटराव यांच्याविरोधात सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे व्यवहार केले होते. अधवटराव यांच्यापाठोपाठ त्यांच्या इतर साथीदारांचीही पोलीस शोध घेत आहे. अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 135/2021 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39, 45 सह भा.दं.वि.कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदूल अधवटराव हे भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

News English Summary: Police have raided the house of Vidul Pandurang Adhatrao, a close associate of Bharatiya Janata Party spokesperson Chitra Wagh and president of Pandharpur BJP’s Yuva Morcha. Police and Assistant Registrar have raided the house of Vidhar Adhatrao, Pandharpur city president of Bharatiya Janata Party’s Yuva Morcha. A complaint was lodged against Adhatrao at the police station.

News English Title: Police raid on the house of BJP Pandharpur Yuva Morcha Adhatrao news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x