30 November 2023 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट BHEL Share Price | सरकारी कंपनीचा भरवशाचा शेअर! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्स अप्पर सर्किटवर, फायदा घेणार?
x

#VIDEO: भारतानं मारले पाकचे सैनिक, पाकिस्ताननं पांढरं निशाण फडकवलं

Pakistani Army, PoK, Jammu Kashimir, White Flag, Indian Army

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं होतं. यानंतर पाकचे सैनिक या घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले.

काश्मीरमधील हाजीपूर सेक्टरमधील हा व्हिडिओ १० ते ११ सप्टेंबरदरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. यात पाकिस्तानी सैनिका पांढरा झेंडा दाखवताना दिसत आहेत. त्यात सैनिक खांद्यावर मृतदेह घेऊन जाताना दिसतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या ठार झालेल्या सैनिकांमध्ये गुलाम सरूलचा समावेश आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलनगर परिसात राहत होता.

याआधी पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या अजून एका पंजाबी मुस्लीम सैनिकाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जोरदार गोळीबार केला होता. मात्र, भारतीय जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरामुळे अनेक प्रयत्न करुन सुद्धा पाकिस्तानला आपल्या सैनिकांचे मृतदेह नेता आले नाहीत. यानंतर मृतदेह परत नेण्यासाठी १३ सप्टेंबरला पांढरा झेंडा दाखवावा लागला.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x