8 December 2021 6:41 PM
अँप डाउनलोड

कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा.

तमिळनाडू : आज तामिळनाडूमध्ये कमल हसन यांनी त्यांच्या पक्षाचा नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव “मक्कल नीति मय्यम” म्हणजे “लोक न्याय पार्टी” असं करण्यात आलं.

मदुराई मध्ये एका दिमाखदार सोहळ्यात त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आणि त्यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. परंतु विशेष म्हणजे या सोहळ्यात अपाचे सर्वेसेवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती.

कमल हसन यांचा तामिळनाडूत खूप मोठा चाहता वर्ग आहे. या सोहळ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि आपण त्यांच्याच पाऊल वाटेवर चालत राजकारण करणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा हाच आपला राजकारणात येण्या मागचा प्रमुख उद्देश्य आहे असं ही ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Kamal Haasan(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x