5 August 2021 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी

former MLA Harshvardhan Jadhav

मुंबई, १७ जून | मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असणारं म्हणजे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव असंच म्हणावं लागेल. तेच हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि ते सुद्धा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच असं दिसतंय. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जालना लोकसभा मतदारसंघात बॅनल लागले आहेत. त्यामुळे आता जालना लोकसभा मतदारसंघ सासरे विरुद्ध जावई अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर गेली 25 वर्षे सुरु असलेलं दानवाच्या राज्याचं रुपांतर आपण रामराज्यात करु, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. महत्वाची बाबत म्हणून जालना लोकसभा मतदारसंघात लागलेल्या हर्षवर्धन जाधव यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर त्यांच्या मैत्रिण इशा झा यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच इशा झा यांच्या नावापुढे जाधव हे आडनावही लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Banners of former MLA Harshvardhan Jadhav in Jalna LokSabha constituency news updates.

हॅशटॅग्स

#HarshvardhanJadhav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x