14 November 2019 12:08 AM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मराठाद्वेषी आहेत: आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात घडत असलेल्या विषयाला अनुसरून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात मराठाद्वेषी राजकारण करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या, दरोडे, मटका, जुगार, अवैध दारू वाहतूक होत आहे. त्यामुळे ते थांबविण्यासाठी स्थानिक पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करावा. पोलिसांनी चोरट्यांना धाक दाखविण्यासाठी सिंघम व्हावे. परंतु जिल्ह्यातील मराठ्याला धाक दाखविण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर असे घडले तर आम्ही त्याची जराही गय करणार नाही. जिल्ह्यातील मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करावा, असे थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

स्थानिक पोलिस प्रशासनाकडून केवळ मराठा समाजाच्या तरुणांना नोटीसा दिल्या जात आहेत. जिल्ह्यात सध्या मराठा व्देषी राजकारण होत आहे. कारण जिल्ह्याला दीपक केसरकर हे मराठाद्वेषी पालकमंत्री मिळाले आहेत, असा थेट आरोप आमदार नीतेश राणे यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(31)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या