14 November 2019 12:03 AM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही: उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकणे गरजेचे आहे असं सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

याआधी आघाडी सरकारने राणे समितीच्या अहवालानंतर मराठा आरक्षण दिलं, परंतु ते कोर्टात टिकलं नाही याची आठवण सुद्धा सुभाष देसाई यांनी करून दिली. अशा प्रकारे या विषयाची पार्श्वभूमी असल्याने आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट असल्याने तो निर्णय घाईत घेता येणार नाही असा सुद्धा सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.

मराठा समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणावर गरीब वर्ग आहे आणि त्यामुळे राज्यभर सुरु असलेलं मराठा आरक्षणाच आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित नाही त्यांना आरक्षण मिळायला हवं असं सुभाष देसाईंनी स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

#Shivsena(726)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या