पुणे : अामिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला. यंदाचा प्रथम क्रमांक साताऱ्यातील टाकेवाडी या गावाने पटकावला आहे. आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पारिताेषिकाचे वितरण विजेत्यांना करण्यात अाले. बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा पारिताेषिक वितरण समारंभ पार पडला.

दरम्यान या कार्यक्रमाला राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी राजकीय नेत्यांमध्ये सिंचन विषयावरून जुगलगंधी अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विराेधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्‍यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, अमृता फडणवीस अादी मान्यवर उपस्थित हाेते.

प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याटाकेवाडी गावाला वाॅटर कप ट्राॅफी तसेच ७५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात अाला. तसेच द्वितीय क्रमांक सातारच्या भांडवली अाणि बुलडाणाच्या सिंदखेडा या गावांना विभागून देण्यात अाला. २५ लाख रुपये प्रत्येकी तसेच सन्मानचिन्ह असे पारिताेषिक या गावांना देण्यात अाले. तृतीय क्रमांक हा बीडच्या आनंदवाडी अाणि नागपूरच्या उमठा या गावांना विभागून देण्यात अाला आणि या दोन्ही गावांना २० लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह सुपूर्द करण्यात अाले. दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला २५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गावांना १५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या गावांना १० लाखांचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Satara based Takewadi village is the winner of water cup of Paani Foundation