26 October 2021 3:51 AM
अँप डाउनलोड

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे माजी महापौर दत्ता दळवींच्या राजीनामा

मुंबई : आगामी निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी शिवसेनेतील मुलुंडमधील पक्षांतर्गत गरामागरमी सुद्धा बाहेर येऊ लागली आहे. परंतु ईशान्य मुंबईतील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमधील थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोरच ईशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटक संध्या वढावकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याचाच प्रत्यय म्हणजे आज मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवून दिला आहे. त्याच कारण म्हणजे आज शिवसेनेच्या मुखपत्रात ईशान्य मुंबईतील पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. तरी दत्ता दळवी यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळं स्वतःच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली असली तरी त्यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला असं बोलण्यात येत आहे.

परंतु सर्व असलं तरी दत्त दळवी यांच्या राजीनाम्यामागे काही वेगळी वादग्रस्त कारणं असल्याची चर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. या घटनेचे अजूनही पडसाद उमटू शकतात असं म्हटलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1152)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x