12 December 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

जवानाच पार्थिव आलं आणि त्यासोबत भाजप मंत्र्याचा सेल्फी, सर्वत्र संताप व्यक्त

Army, Indian Army, Pulawama Attack, Jammu Kashmir

नवी दिल्ली : चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही. सध्या अनेक शहीद जवानांचे शव अंत्यविधींसाठी त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

पुलवामा येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले केरळचे वसंत कुमार विवी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे अंत्यंविधीसाठी सुपूर्द करण्यात आलं. दरम्यान, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भाजप खासदार आणि केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री अल्फान्सो काननथानम तेथे हजर झाले आणि त्यांनी चक्क शहिद जवानाच्या पार्थिव म्हणजे शव पेटीसोबत सेल्फी काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यामुळे देशाला राष्ट्रभक्ती शिकणाऱ्या भाजप नेते मंडळींचा खरा चेहरा समोर आल्याची जोरदार टीका समाज माध्यमांवरून करण्यात येते आहे. भाजपचे मंत्रीच किती संवेदनशील आहेत याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x