26 April 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

VIDEO | अर्थतज्ज्ञ राणे, GDP ते नाना पटोले | कोरोनाने माणसं मेली असतील थोडी फार | Social Viral

MP Narayan Rane

मुंबई, ०७ जून | राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच ३ जून रोजी मराठा भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लोकप्रिय मराठी मिम्स पेजने या राणेंच्या पत्रकार परिषदेमधील जीडीपीसंदर्भातील प्रश्नांचा व्हिडीओ एडीट करुन अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झालाय.

संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पत्रकारांनी नकारात्मक जीडीपीसंदर्भात प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी नाना पटोलेंमुळे भारताचा जीडीपी नकारात्मक असल्याचं उत्तर दिल्याने पत्रकारांचाही गोंधळ उडाला. पत्रकारांनी राणेंना प्रश्न नीट समजावून सांगितल्यानंतरही राणेंनी जीडीपी हा खर्च वाढल्याने कमी झाल्याचं उत्तर दिलं. झालं असं जीडीपी नकारात्मक आहे, बेरोजगारीचं प्रमाण रोज वाढत आहे, तरुण नैराश्येत चाललाय यासंदर्भात केंद्र सरकारचं काही धोरण आहे का?, असा प्रश्न सुरुवातीला राणेंना विचारण्यात आल्या.

त्यावर उत्तर देताना राज्यात सतत लॉकडाउन लावला जात असल्याच्या मुद्दा उपस्थित करत राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आमचे मोदी साहेब तर सांगत आहेत की तुम्ही सतत लॉकडाउन लावू नका. बघा जगात काही देशांनी लॉकडाउन लावलाच नाही. माणसं मेली असतील थोडी फार इकडे तिकडे. पण त्यांनी लॉकडाउन न लावता आपली अर्थ व्यवस्था संभाळली. त्यांनी उद्योग सुरु ठेवले. आपण उद्योग, दुकाने बंद केले. बेकारी वाढवली. या राज्याचा आर्थिक तोटा फार होणार. एकही विकास काम होणार नाही, रस्ते नाही, पाणी नाही. काहीच होणार नाही. यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत, असं उत्तर राणे यांनी दिलं.

भारताचे राष्ट्रीय सखल उत्पन्न म्हणजेच जीडीपी नकारात्कम गेलाय यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता नारायण राणेंनी, “कोणी केला यांनी, या नाना पटोलेंनी,” असं उत्तर दिल्यानंतर पत्रकारही गोंधळले. पत्रकारांनी जीडीपीसंदर्भातील प्रश्न होता असं राणेंना पुन्हा एकदा सांगितलं. तुम्हाला देशाच्या जीडीपीबद्दल प्रश्न विचारण्यात आलाय आणि तुम्ही राज्याच्या राजकारणावर उत्तर देताय, असं पत्रकाराने राणेंना सांगितलं. नंतर राणेंनी उत्तर देताना, “का कमी केला तर खर्च वाढला. मी सांगतो ना, इन्कम कमी झाला. अंदाजापेक्षा अधिक जास्त खर्च होतो,” असं राणेंनी म्हटलं. राणे जीडीपीबद्दल बोलत असताना त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती सुद्धा या व्हिडीओमध्ये हसताना दिसत आहे.

 

News English Summary: In the viral video, when journalists asked about the negative GDP, Narayan Rane replied that India’s GDP was negative because of Nana Patole. Even after the journalists explained the question to Rane, Rane replied that the GDP expenditure has come down.

News English Title: Indian GDP in negative growth viral video BJP MP Narayan Rane Blaming Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x