27 April 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पवारांच्या जुन्या प्रतीमेचा वापर करून सेना-काँग्रेस-एनसीपीत फूट पडण्याचा भाजपचा प्लान फसणार

BJP, Sharad Pawar, PM Narnedra Modi, Amit Shah

मुंबई: कोणाच्या ध्यानीमनी नसताना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऐतिहासिक युती झाली आणि विशेष म्हणजे शिवसेना एनडीए’मधून देखील बाहेर पडत भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेली असताना पाहून भाजपचे केंद्रीय नैतृत्व देखील विचारात पडलं आहे. यासर्व राजकीय उलथापालत शक्य झाल्या त्या केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच हे सर्वश्रुत आहे.

मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात धक्के बसण्यास सुरुवात होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र त्यानंतर खडबडून जाग आलेल्या भाजप नैतृत्वाने पवारांच्या प्रतिमेचा वापर करून महाविकासआघाडीत फूट पडण्याची योजना आखली आणि त्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबीयांनाच स्वतःकडे ओढत यामागे शरद पवारच आहेत, असा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पवारांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांना खोडून काढत, आमदारांशी पुन्हा संपर्क करून भाजपाचा डाव मोडून काढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर एकदिवसातच परिस्थिती पुन्हा भाजपवर उलटू लागल्याचे दिवसातच अचानक अजित पवार ट्विटरवर ऍक्टिव्ह झाले आणि त्यात महत्वाचा बदल म्हणजे अजित पवार चक्क इंग्लिश’मध्ये ट्विट करू लागले आहेत. त्या ट्विटमध्ये देखील मी स्वतः म्हणजे अजित पवार अजून राष्ट्रवादी पक्षात असून, राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार देखील माझ्या बंड करण्यामागे आहेत असा संदेश देत पुन्हा तोच कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरून अजित पवारांचं ट्विट असलं तरी ते भाजपाची डिजिटल सेना सध्या त्यांना मार्गदर्शन करत असल्याचं अभ्यासाअंती निदर्शनास येईल. मात्र त्यावर देखील शरद पवारांनी लगेच करत सर्व मुद्दे खोडून काढले आणि भाजपाला कडाडून विरोध करत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत असल्याचा संदेश दिला. त्यानंतर अजित पवारांची धावपळ सूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या त्यांच्या मागे ते स्वतः धरून दोनच आमदार उरले आहेत आणि त्यामुळे त्यांचं राजकीय आयुष्यच पणाला लागलं आहे.

राजकीय डावपेचात निष्णात असलेल्या शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाचा हा डाव त्यांच्यावरच उलटवण्याची तयारी केली आहे. शनिवारी दिवसभर त्यांनी विधिज्ञांशी सल्लामसलत केली. विधिमंडळ गट नेता बदलण्याचा ठराव देखील त्यांच्या सल्ल्यानुसार तयार केला. उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सकृतदर्शनी ही लढाई सगळ्यांसाठी अजित पवार विरुध्द शरद पवार अशी दिसत असली तरीही त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे राजकारण आहे.

जर सरकारवरील विश्वास ठराव मंजूर झाला तर आपोआप शरद पवार यांचे राजकारण मर्यादित होईल. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार यावे म्हणूनच अजित पवार यांना भारतीय जनता पक्षामध्ये पाठवले, हा तर त्यांचा स्वभावच आहे, असे वातावरण तयार करुन शरद पवार यांच्या जुन्या प्रतीमेचा वापर करत देशभरात त्यांना टीकेचे लक्ष्य करायचे आणि जर विश्वास ठराव नामंजूर झाला तर अजित पवार यांच्यामुळेच ते झाले. त्यांच्यामागे कोणी नव्हते असे म्हणत सगळे खापर त्यांच्यावर फोडून मोकळे व्हायचे, असाही भारतीय जनता पक्षाचा यामागे डाव आहे. पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भाजपशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांनी स्वतः केवळ आमदार नव्हे तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करत आत्मविश्वास दिला असून आता दोन करण्यास सज्ज राहा असा संदेश देत, भारतीय जनता पक्ष यापुढे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही ठरला जाईल असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x