8 May 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

बारामतीत डिपॉझिट जप्त झालं, सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही - शरद पवार

NCP President Sharad Pawar, MLA Gopichand Padlkar

सातारा, २७ जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: People have answered Padalkar at that time, said Sharad Pawar. If he fought against us in Baramati Lok Sabha and Vidhan Sabha elections, his deposit was confiscated. Nothing happened to him even in Sangli Lok Sabha said Sharad Pawar over Gopichand Padalkar.

News English Title: NCP President Sharad Pawars reaction on Gopichand Padlkar and comment Devendra Fadanvis at Satara News latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x