खुशखबर! पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा: सरकारचा निर्णय
मुंबई: अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून यासंदर्भात अनेक अपेक्षा होत्या. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. तसेच मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी सेनेची देखील हीच मागणी होती.
शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय.त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली@CMOMaharashtra pic.twitter.com/YTVbbkL9iZ
— Supriya Sule (@supriya_sule) December 1, 2019
त्यामुळे आंदोलक विद्यार्थी आणि मागणी करणाऱ्या सर्व पक्षांच्या निवेदनांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास या महापोर्टल मार्फत होणाऱ्या ऑनलाईन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आदेशानुसार, सदर पोर्टलमधील सर्व त्रुटी अशी दूर करून, त्यानंतर सुसज्य आणि त्रुटी विरहित पोर्टल बनवून सदर भरती प्रक्रिया पुढे पार पाडली जाईल असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने प्रशासनाला दिले होते.
त्यामुळे राज्य पोलिस दलातील जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून, पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल. या निकषानुसार लवकरच सुमारे ११ हजार रिक्त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून, याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे. या माध्यमातून पोलिस दलास सक्षम जवान मिळणार असून, याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होईल असे बोलले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यातच याबाबतचे सूतोवाच केले होते.
पोलिस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. दोन्ही चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर होते. या निवड प्रक्रियेमुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण होतात. परिणामी पोलिस दलाला योग्य आणि सक्षम जवान मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात आल्याने पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक बेरोजगार युवा-युवतींनी अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती.
हे नव्याने होणार पोलिस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर आता उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. त्यांना सोळाशे आणि शंभर मीटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागेल. गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स या प्रकाराची १०० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. याआधी लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळण्यात आले होते, त्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
Web Title: Written examination be done after ground physical test in Maharashtra police recruitment.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News