14 November 2019 1:10 PM
अँप डाउनलोड

राज्य पोलीस भरती लेखी परीक्षेचा मोफत ऑनलाईन सराव थेट महाराष्ट्रनामा न्यूजवर

Maharashtra Police Bharti, Police Bharti, Police Bharti Practice, Police Bharti Sarav, MPSC, MPSC Practice, UPSC Practice, Talathi Bharti, govexam, govexam.com, mahanmk.com, mahanmk, Sarkari Bharti, Sarkari Pariksha online study

मुंबई: महाराष्ट्र पोलीस खात्याची मेगाभरती जाहीर झाली असून ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर अशी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तरुण-तरुणी सहभाग नोंदवतात. मात्र यंदा भरतीचा आकडा मोठा असून खाजगी नोकऱ्यांची कमी आणि ग्रामीण भागात रोजगाराचं साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांचा मोठा सहभाग असेल पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं आहे.

मात्र यंदा भरती प्रक्रियेत सर्वात मोठा बदल करण्यात आला असून नव्या नियमानुसार पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याने आधी उमेदवारांना प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लेखी परीक्षा होणार असल्याने अडीच महिन्याचा कालावधी उमेदवारांकडे आहे. दरम्यान, या परीक्षेला ग्रामीण भागातील उमेदवारांना सामान्य ज्ञानाची महागडी पुस्तकं परवडत नाहीत आणि आयत्यावेळी अभ्यासासाठी पुस्तकं उपलब्ध नसल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

राज्यभरातील अनेकांची अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्रनामा न्यूज’ने सदर परीक्षेचा संपूर्ण अभ्यास विद्यार्थ्यांना घर बसल्या करता यावा यासाठी आमच्या पोर्टलवर मोफत ऑनलाईन सराव करण्याची कायमस्वरूपी सोय करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये यापूर्वीच्या परीक्षांचे झालेले पेपर्स, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी. MPSC, महावितरण आणि सरकारी खात्यांच्या जवळपास सर्वच विभागांच्या परीक्षांचा मोफत ऑनलाईन सराव करता येणार आहे. सांगली आणि कोल्हापुरात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि घरातील वस्तूंसोबत पोलीस भरती आणि सरकारी नोकरीच्या सरावासाठी घेतलेली पुस्तकं देखील वाहून गेल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र त्यांची देखील घरबसल्या सोय महाराष्ट्रनामा न्यूज’च्या पोर्टलवर ऑनलाईन करून देण्यात येणार आहे.

येत्या १-२ दिवसात ही ऑनलाईन मोफत सेवा राज्यभर कार्यान्वित करण्यात येईल आणि उमेदवार घरबसल्या मोबाईलवर देखील सराव करू शकतात. या स्वयंचलित प्रणालीत तुम्ही ऑनलाईन पेपर्स सोडवू शकता आणि एकूण किती मार्क्स पडले तसेच चुकलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय होतं हे देखील समजू शकेल. यातील स्वयंचलित टायमर तुम्ही किती वेळ संपूर्व पेपर सोडवायला घेतला ते देखील निर्देशित करेल. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यासाची सोय महाराष्ट्रनामा न्यूज पोर्टल मोफत करून देणार आहे. यासाठी आम्ही उत्तर दर्जेदार आणि सहज समजेल आणि हाताळता येईल अशी स्वयंचलित यंत्रणा बनवली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

हॅशटॅग्स

#Maharashtra(37)#MaharashtraPolice(4)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या