30 May 2023 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

कडेलोट करावा हीच भाजप सरकारची लायकी: राजू शेट्टी

मुंबई : सध्या सत्तेत असलेलं भाजप सरकार हे शिवछत्रपती यांचा आशीर्वाद घेऊन कडेलोट करावा अशीच लायकी आहे. धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्नं केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याच विषयाला धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्नं केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राजू शेट्टी आले असता त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांच्या सोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुध्दा उपस्थित होते.

राज्य सरकार संपादित करत असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्यामुळे ते मंत्रालयात आले होते. परंतु मंत्रालयात वारंवार हेलपाटे मारून सुध्दा योग्य मोबदला मिळत नसल्या कारणाने अखेर हतबल होऊन अखेर शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची परिस्तिथी गंभीर असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x