25 April 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली
x

नीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आणि ईडीने नीरव मोदींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केल्यामुळे मी तुमचे पगार देण्यास देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही नवीन नोकरी शोधावी असा थेट ईमेलच त्याने कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.

पीएनबी बँक प्रकरण जेव्हापासून सार्वजनिक झाले आहे, तेव्हापासूनचा वेगाने घडणाऱ्या घडामोडींचा कल पाहता निष्पक्ष तपास होईल का याबाबतच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. कारण घोटाळा जरी ११,३५० पेक्षा मोठा असला तरी त्यात गुंतलेल्या मोठ्या व्यक्तींची नावे आणि इतिहास पाहता हे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या घोटाळ्यात मात्र निष्पाप लोकांचेच बळी आधी जाऊ लागले आहेत आणि हे कर्मचारी सुध्दा त्यातलाच एक भाग आहेत असे बोलले जात आहे. परदेशी पलायन केल्यानंतर नीरव मोदींचा हा दुसरा ई-मेल आहे जो त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. पहिला ई-मेल त्याने पीएनबी बँकेला पाठवला होता.

हॅशटॅग्स

#Nirav Modi(11)#PNB Scam(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x