9 July 2020 9:38 AM
अँप डाउनलोड

पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.

मुंबई : पीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत. त्यामुळे पीएनबी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

माझ्या कंपनीवर ५,००० कोटीपेक्षा कमी रुपयांचे कर्ज असताना पीएनबीने कर्जाचा आकडा फुगवून सांगितला आहे. नीरव मोदीने त्या संबंधित १५ – १६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पत्र व्यवहार करून कळवले आहे. या बाबतचे वृत्त पीटीआय ने दिले आहे.

पीएनबीने चुकीचा आकडा प्रसारमाध्यमांपुढे सार्वजनिक केल्या मुळे त्याचा माझ्या व्यवसायावर थेट परिणाम झाल्याने माझ्या कंपनीची कर्ज परत करण्याची क्षमताच तुम्ही धोक्यात आणली आहे. माहिती सार्वजनिक झाल्याने माझ्या कंपनीचे व्यवसाय आणि ब्रँड दोन्ही उध्वस्त झाले असून तुमचे कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत असे नीरव मोदी पत्राद्वारे म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

पुढे निरव मोदी असेही पत्राद्वारे म्हणाला आहे की, माझे मामा मेहुल चोक्सी याचा स्वतंत्र व्यवसाय असूनही त्याचे नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच माझ्या पत्नीचाही यात काहीही संबंध नसून तरीही तिचं नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे नीरव मोदीने पत्रात नमूद केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nirav Modi(11)#PNB Scam(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x