20 May 2022 10:08 AM
अँप डाउनलोड

राज ठाकरेंचे आरोप खरे ठरले! नमामि गंगे केवळ देखावा: वॉटरमॅन राजेंद्र सिंह

Namami Gange, Narendra Modi, BJP

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध वॉटरमॅन, जलतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी राजेंद्र सिंह यांनी मोदी सरकारवर नमामि गंगे अभियानावरून सडकून टीका केली आहे. गंगा नदीच्या सद्यस्थितीवर बोलताना राजेंद्र सिंह म्हणाले की गंगा नदी पहिल्यापेक्षाही अधिक दूषित झाली आहे. नमामि गंगा अभियानाचा मूळ उद्देश हा गंगा नदी प्रदूषणमुक्त करणे हा होता, मात्र केंद्राची हि योजना केवळ सौंदर्यीकरण एवढंच असून प्रचंड पैसा खर्च करून देखील नदी पूर्वीपेक्षा देखील अधिक प्रदूषित झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच पुढे ते म्हणाले की देशातील १६ राज्यांमधील तब्बल ३५२ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. भीषण दुष्काळ पडलेल्या राज्यांमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे देशातील तब्बल ९० टक्के छोट्या नद्या पाण्याअभावी सुकल्या आहेत. परिणामी आजूबाजूच्या गावांमध्ये भीषण दुष्काळ पसरला आहे. पुढे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, राजकीय पक्षांना या गंभीर समस्येबाबत काहीच सुख दुःख नसून त्यांना केवळ सत्तेत टिकून राहणं महत्वाचं झालं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनसेची गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा झाली तेव्हा राज ठाकरे यांनी देखील भर सभेत नमामि गंगा योजनेचा दाखला देत मोदी सरकारवर आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी सभेत पुरावा देताना म्हटलं होतं, ‘नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले ,गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी.डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते, पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते वारले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)#Raj Thackeary(713)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x