29 March 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Maharashtra Bandh On Lakhimpur Kheri Incident | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा ११ तारखेला महाराष्ट्र बंद

Maharashtra Bandh on Lakhimpur Kheri Incident

मुंबई, ०६ ऑक्टोबर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा (Maharashtra Bandh On Lakhimpur Kheri Incident) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Maharashtra Bandh On Lakhimpur Kheri Incident. The Mahavikas Aghadi government has announced a Maharashtra Bandh on October 11 to protest the incident at Lakhimpur in Uttar Pradesh :

काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष उर्फ मोनू गेला होता. यावेळी आशिषच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आणि आंदोलनकर्ते शेतकरी समोरासमोर आले. ज्यानंतर मोनूच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत लखीमपूरमधली घटना दुर्दैवी आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.

नेमकं घडलं तरी काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी तेनी गावात बनवीरमध्ये उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर ताबा मिळवत कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले असताना याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh on Lakhimpur Kheri Incident to support farmers.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x