14 December 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Post Office Scheme | फक्त 5000 भरून 10 वर्षांमध्ये बना 8 लाखांचे मानकरी; कसं? वाचा सविस्तर बातमी

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचबरोबर भविष्यामध्ये आपली काहीतरी पुंजी असावी असा विचार करून ठिकठिकाणी पैसे गुंतवतो. या इन्वेस्टरसाठी पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत जबरदस्त स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.

यामध्ये तुम्ही लहान मुलापासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही खातं उघडताना फक्त 100 रुपये भरून हे खातं उघडू शकता. ही अनोखी स्कीम नेमकी कोणती आहे ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.

असे बना 10 वर्षात 8 लाखांचे मानकरी :
या छप्परफाड परतावा देणाऱ्या स्किमचं नाव आहे पोस्ट ऑफिस RD स्कीम. या स्कीममुळे तुम्हाला लखपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये जर गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवत असेल तर, 5 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये त्याचे एकूण तीन लाख रुपये जमा होतील. ज्यावर 6.7 टक्के व्याजाने 56,830 एवढी रक्कम जमा होईल. म्हणजेच तुमचा एकूण फंड ‘5,56,830’ एवढी रक्कम परत मिळेल. तुम्ही हा कार्यकाळ 10 वर्षांपर्यंत देखील सुरू ठेवू शकता.

10 वर्षाच्या हिशोबाने सांगायचे झाले तर, प्रत्येक महिन्याला 5000 इन्व्हेस्ट करून तुमच्या खात्यात दहा वर्षांमध्ये 6,00,000 एवढी रक्कम जमा होईल. 6.7 टक्के व्याजाच्या दराने हिशोब केला तर 2,54,272 एवढे व्याजदर मिळेल. म्हणजे तुमची टोटल रक्कम होईल 8,54,272. तर मग वाट कसली बघताय? लवकरच पोस्ट ऑफिस आरडी या स्कीमचा लाभ घ्या.

या स्कीममध्ये ही सुविधा सुद्धा मिळेल
पोस्ट ऑफिस RD या स्किममध्ये तुम्ही खात उघडलंय. परंतु काही कारणास्तव तुम्हाला खातं बंद करायचं आहे. तर यासाठी देखील काही तरतुदी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये प्री मॅच्युअर क्लोजर या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमचा मॅच्युरिटी पिरेड म्हणजेच पैसे गुंतवण्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच हे खातं बंद करू शकता. यामध्ये लोन सुविधा प्राप्त केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमचं चालू अकाउंट जरी बंद केलं तरीसुद्धा एका वर्षामध्ये जमा झालेली रक्कम तुम्हाला 50 टक्क्यांने परत मिळेल.

या योजनेबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवा :
या गोष्टीकडे नीट लक्ष द्या, पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आणि मिळालेल्या व्याजावर TDS कापला जातो. जो इन्वेस्टरने आयटीआरवर हक्क दाखवल्यामुळे उत्पन्नाच्या रूपात कापला जातो. या स्कीममध्ये मिळणाऱ्या व्याजावर दहा टक्के टीडीएस लागू होतो. तुम्हाला मिळणारं व्याज दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर, तुमचा टीडीएस कापला जाईल.

News Title : Post Office Scheme RD Benefits 30 August 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x