28 March 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

NCB Press Conference | साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन गेले? | NCB कोर्टात फसणार?

NCB on BJP Connection Allegations

मुंबई, ०६ ऑक्टोबर | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB On BJP Connection Allegations) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन येतात हे कोणत्या नियमात बसतं ते सांगणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.

NCB on BJP Connection Allegations. Bollywood actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan has become embroiled in a drug case. Nawab Malik had slammed the BJP even within the NCB over the Aryan Khan action. The NCB responded by holding a press conference :

2 तारखेला आम्ही कारवाई केली, त्यावेळी वेगवेगळे ड्रग्स सापडले, त्यावेळी आठ लोकांना अटक केली. मोहक जैस्वालच्या माहितीनंतर अब्दुल कादीर शेखला अटक केली, एमडी ड्रग्ज सापडलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला गोरेगाव मुंबईला ही कारवाई केली, श्रेयस नायरला अटक केली. मनीषकडे हायड्रोफोनिक वीड सापडलं. प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार आहेत. जे आरोप आमच्यावर होत आहेत ते चुकीचे आहेत, याचा थेट संबंध यापूर्वी केलेल्या कारवाईशी आहे. कोकेन, चरस आदी ड्रग्स सापडलेत, असंही एनसीबीनं स्पष्ट केलंय.

अब्दुल कादिर याला 3 ऑक्टोबरला अटक केली, त्यानंतर श्रेयस नायर याला अटक केली, त्यानंतर अमीन साहू , दर्या या दोघांना अटक केली. हे जहाजावर प्रवासी होते. जहाजावर अनेक कारवाई केली. आतापर्यंत चार ठिकाणी धाडी टाकल्यात, मनीष राजगडिया हा शिपवर गेस्ट होता, तिथे चरस सापडलं. इवेंट मॅनेजमेंटमध्ये या सगळ्यांना अटक करण्यात आली. सारे पंचनामे कायद्याने बनवलेत. स्वतंत्र साक्षीदार आहेत. काही आरोप लावण्यात आलेत, ते बिनबुडाचे आहेत. आमच्यावर जे आरोप केलेत ते चुकीचे आहेत, असंही स्पष्टीकरण एनसीबीनं दिलंय.

एनसीबीच्या कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केलेल्या साक्षीदारांचीही माहिती यावेळी देण्यात दिली. एनसीबीनं काही व्यक्तींची नावं जाहीर केली. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचीही नावं घेतली. “क्रूझवर टाकलेल्या छाप्यासाठी काही जणांनी आम्हाला माहिती देण्याचं काम केलं होतं. संपूर्ण कारवाई कायदेशीर पद्धतीनंच झालेली आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणूनही आम्हाला काही जणांनी मदत केली आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही”, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात कसे घेऊन जाऊ शकतात, NCB कोर्टात फसणार?
नियमानुसार कोणताही सामान्य माणूस एखाद्या सरकारी संस्थेच्या कारवाईत उदाहरणार्थ NCB’च्या कारवाईत थेट संबंधित प्रकरणातील आरोपींना हात लावून थेट अधिकाऱ्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांना कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाहीत. अगदी खबरी किंवा संबंधित प्रकरणातील साक्षीदार देखील अशी भूमिका बजावू शकत नाहीत. जर कारवाईच्या ठिकाणी अधिक लोकं असतील तर कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांना तशी कल्पना देऊन त्याप्रमाणात पोलिसांची कुमक बोलवावी लागते. मग NCB अधिकाऱ्यांनी असं धाडस करून नियम धाब्यावर कसे बसवले असा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाल्यास NCB नक्कीच कायद्याच्या कचाट्यात फसेल. विशेष म्हणजे त्या भाजप कार्यकर्त्यांचे तसे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB on BJP Connection Allegations but avoid answering about BJP workers involvement in NCB raided.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x