14 January 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या
x

Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status | तुम्ही घरबसल्या IPO अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता

Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status

मुंबई, ०६ ऑक्टोबर | मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात (IPO) आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla AMC IPO Allotment Date) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता. तुम्ही घरबसल्या आयपीओ अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता. गुंतवणूकदार BSE च्या वेबसाइट bseindia.com द्वारे शेअर्सचे हे वाटप तपासू शकतात. दरम्यान जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत केले जातील.

Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status. If you have invested in the IPO of Aditya Birla Sun Life AMC Limited, you can now check how many shares are in your account. You can check the IPO allotment online from home :

29 सप्टेंबर रोजी बाजारात आलेला हा आयपीओ 1 ऑक्टोबर रोजी बंद झाला होता. IPO अंतर्गत शेअर्सचे वाटप 6 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज होत आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ AMC लिमिटेडच्या IPO ला शुक्रवारी शेवटच्या दिवशी 5.25 पटीत सबस्क्राइब करण्यात आले होते. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही शेअर अलॉटमेंट तपासू शकता.

BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट:
* सर्वात आधी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या
* यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा
* त्यानंतर Issue Name (Aditya Birla Sun Life AMC IPO) निवडा
* याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा
* यानंतर सर्च बटनवर क्लिक करा
* सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट:
* सर्वात आधी तुम्हाला या https://ris.kfintech.com/ipostatus/ipos.aspx लिंकवर भेट द्यावी लागेल
* यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा
* यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा
* तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा
* यानंतर Captcha सबमिट करा
* याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल
* तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. 6 ऑक्टोबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल आणि 8 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या डीमॅट खात्यात ते जमा केले जातील. रिफंडचे पैसे त्याच खात्यात येतील ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status check your shares status.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x