26 April 2024 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तक्रार अर्ज महिलेचा नाही, महिलेच्या नावाचा वापर, स्वाक्षरी सुद्धा खोटी | षडयंत्र रचलं कोणी?

Sanjay Rathod

यवतमाळ, २१ ऑगस्ट | संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

तक्रार अर्ज महिलेचा नाही, महिलेच्या नावाचा वापर, स्वाक्षरी सुद्धा खोटी | षडयंत्र रचलं कोणी? (Yavatmal Police SIT team gave clean cheat to Shivsena leader Sanjay Rathod) :

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची ट्विटमध्ये पुढील प्रमाणे माहिती दिली होती. “शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो,” असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले होते. मात्र, आता हे पत्र आणि पत्रात नमूद करण्यात आलेली महिला यांचा एकमेकांशी संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मात्र पोलिसांच्या विशेष टीमने केलेल्या प्रत्यक्ष चौकशीत मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे. परिणामी माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आपोपाप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांनी ही क्लीनचीट दिलेली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

यवतमाळ पोलिसांनी काय सांगितले ?
विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे. (Yavatmal Police SIT team gave clean cheat to Shivsena leader Sanjay Rathod)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Yavatmal Police SIT team gave clean cheat to Shivsena leader Sanjay Rathod news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x