स्वाभिमानीचे आमदार लवकरच राष्ट्रवादीत? | थेट राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थिती

अमरावती, ०५ फेब्रुवारी: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहे. राष्ट्रवादीत दररोज इन्कमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Swabhimani Shetkari party MLA Devendra Bhuyar may join NCP party soon)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. काल अमरावती येथे यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हा परिवार संवाद कार्यक्रम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातून पत्रकारांना व इतर कार्यकर्त्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.
परंतु, कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णवेळ हजेरी लावली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करत थेट सभेच्या व्यासपीठावर जाऊन बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.भुयार यांनी भविष्यातील राजकीय संकेत तर दिले नाहीत ना? या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
News English Summary: Since the formation of the Mahavikas Aghadi government in the state, the days of harvest have come for the NCP. The NCP seems to be getting incoming every day. Many MLAs and leaders in the BJP are in touch with the NCP. On the other hand, Swabhimani Shetkari Sanghatana MLA Morshi constituency MLA Devendra Bhuyar is also on the path of NCP.
News English Title: Swabhimani Shetkari party MLA Devendra Bhuyar may join NCP party soon news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा
-
Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा