28 September 2022 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा
x

Viral Video | शिंदे पत्रकारांना त्यागाबद्दल सांगत होते, आ. भुमरे हसत समोरच्याला इशारा करून, 'साहेब बघ कसे दणादण फेक....???

MLA Sandipan Bhumre

Viral Video ​​| मुख्यमंत्री व्हायला मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला दूर केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर गद्दार कोण आणि खुद्दार कोण? हे महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोके सरकार म्हणून हिणवलं जातं आहे. पण लक्षात ठेवा माझ्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे असाही इशारा एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीतून दिला होता.

आत्तापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरते आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. एकनाथ शिंदे हे बंड केल्यापासूनच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं वारंवार सांगत आहेत. तोच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला होता.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळेची त्यांच्यासोबत मोजके समर्थक आमदार सुद्धा होते. त्याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. त्यामध्ये एकाबाजूला मुख्यमंत्री आपण आणि इतरांनी शिवसेनेसाठी काय काय केलं त्याचा पाढा पत्रकारांसमोर वाचत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डावीकडे बसलेलं आमदार संदीपान भुमरे हे स्वतःच्या उजवीकडे असलेल्या कोणत्यातरी परिचित व्यक्तीसोबत स्मित हास्याने शिंदेंकडे कटाक्ष टाकून इशारा करत आहेत. यावरून समाज माध्यमांवर ते नेमकं काय बोलत आहेत यावर व्यक्त होतं आहेत. त्यावर अनेकजण ‘साहेब काय दणादण फेकत आहेत बघ असा त्याचा अर्थ लावत आहेत.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Sandipan Bhumre expression and smile during CM Enkath Shinde press conference check details 22 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x