27 July 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

राणेंची जन संपर्क यात्रा | संपूर्ण मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप नेते नारायण राणे येताच संपर्का बाहेर

Narayan Rane

मीरा भाईंदर, २२ ऑगस्ट | केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे काल मीरा भाईंदर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे पाठ फिरवली. परंतु मराठा समाजाने मात्र काशीमीरा नाक्यावर राणे यांचे आपुलकीने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर, राज्यातील इतर केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच राणे यांनीसुद्धा पक्षादेशाप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे काल मीरा भाईंदर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे पाठ फिरवली (Mira Bhayandar BJP leaders ignored union minister Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra) :

यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी भेटीगाठी व जनसंपर्क साधून भारतीय जनता पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आज शनिवारी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मीरा-भाईंदरमधून गेली. मात्र मीरा भाईंदर महापालिकेत सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र राणे यांच्या यात्रेकडे सपशेल पाठ फिरवली.

पालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापतींसह भारतीय जनता पक्षाचे एकूण ६० नगरसेवक व समिती सदस्य आहेत. मात्र, तरीही कुणीही राणेंच्या जन आशिर्वाद यात्रेकडे फिरकले नाही. एवढेचन नाही, तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही त्यांच्या जन आशिर्वाद यात्रेकडे गेले नाही. त्यामुळे पक्षाचा मोठा नेता तथा केंद्रीय मंत्री शहरात येऊनदेखील स्थानिक भारतीय जनता पक्षाने नारायण राणेंकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर मान राखण्यासाठी सकल मराठा समाजच्या वतीने स्वागत करण्याचा घाट घातल्याचं म्हटलं गेलं. मात्र सत्ता असलेल्या महागरपालिकेच्या हद्दीत स्वपक्षीय केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्वच भाजप नेत्यांनी पाट फिरवणे ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. (Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra at Mira Bhayandar)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mira Bhayandar BJP leaders ignored union minister Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x