20 April 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. आज सातवा दिवस असून, भाजपच्या गटाने जोर धरला आहे. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबईहून एक खासगी विमान दिल्लीकडे रवाना झालं आहे. महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यावर नवी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. विशेषत: सर्वोच्च न्यायालयाचे वकील महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहेत. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा व्हावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे असं वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ता हवीच म्हणून मोदी-शहांचा दबाव?
शिवसेनेचे तब्बल ३८ पेक्षा अधिक आमदार फुटलेले असतानाच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १४ खासदार बंडखोर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

जर १८ पैकी १४ खासदार शिंदेंच्या गटाला जाऊन मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. आमदारांपाठोपाठ १४ खासदारही शिंदेंच्या गळाला लागले, तर तर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या झेंडा आणि निवडणूक चिन्हावर दावा केला जाऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in constitutional trap after rebel against Shivsena check details 28 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x