महाराष्ट्रावर कोरोनावरून टीका | आता कोरोनामुळे अहमदाबादमध्ये रात्री कर्फ्यूचा निर्णय
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर: देशात मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीचा काळात नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोनाबाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. याचबरोबर करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ४८ हजार ४९३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४५ हजार ५७९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तर कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत.
Night curfew in Ahmedabad city from Friday in view of spike in COVID-19 cases: Official
— Press Trust of India (@PTI_News) November 19, 2020
शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
News English Summary: The Ahmedabad city administration in Gujarat has taken a big decision to stop the spread of corona. A night curfew will be imposed in the city from Friday. The curfew will be from 9 pm to 6 am. So 300 doctors and 300 medical students have been told to be ready to fight Corona (Covid-19). At the same time, 20 ambulances have been prepared. Beds in government and private hospitals in the city have been increased
News English Title: Night curfew in Ahmedabad city from Friday in view of spike in COVID 19 cases news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News