27 July 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला?

Eknath Shinde

Eknath Shinde | गुवाहाटीमध्ये कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगा. कारण असं काही नसतं. एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर पत्रकारांना सांगितलं की, “आम्ही सगळे एक आहोत. उद्धव ठाकरेंच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांचं नाव उघड करा, असं थेट आव्हानच एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

लवकरच मुंबईत परतणार असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज तो आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर होता. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दीपक केसरकर हे आमच्या ग्रुपचे प्रवक्ते असून ते तुम्हाला सर्व माहिती देतील. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकरणात उडी :
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा व्हावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे असं वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ता हवीच म्हणून मोदी-शहांचा दबाव?
शिवसेनेचे तब्बल ३८ पेक्षा अधिक आमदार फुटलेले असतानाच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १४ खासदार बंडखोर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

जर १८ पैकी १४ खासदार शिंदेंच्या गटाला जाऊन मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. आमदारांपाठोपाठ १४ खासदारही शिंदेंच्या गळाला लागले, तर तर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या झेंडा आणि निवडणूक चिन्हावर दावा केला जाऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel meet at Delhi over Maharashtra Political crisis check details 28 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x