19 January 2022 1:23 AM
अँप डाउनलोड

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी राज्यात फिरायलाच पाहिजे असे नाही - अनिल परब

Chief Minister Uddhav Thackeray, Minister Anil Parab, Marathi news ABP Maza

मुंबई, २ सप्टेंबर : प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, या आरोपाला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आक्रमक स्वरुपात उत्तर दिले आहे. अनिल परब यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरुन ते सातत्याने बैठका घेत आहेत. प्रत्येक वेळी राज्यात फिरायलाच पाहिजे असे नाही. आवश्यकता भासेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्व:ता दौरे करत आहेत. जे लोक आज आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या टीकेत काहीही दम नाही. केवळ कोणाला तरी बदनाम करायचे म्हणून हे लोक टीका करत आहेत.

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, वर्षा बंगल्यावरुन बैठका घेण्याला जर कोणी घरुन काम करणे म्हणत असेल तर या आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत होते? ते देखील वर्षा बंगल्यावरुन म्हणजे घरुनच काम करत होते असे म्हणायला हवे असेही परब यांनी सांगितले.

विरोधी पक्षाचे नेते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत असे विचारले असता, विरोधी पक्षाचे नेते आता दौरे करत आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकारचे मंत्री या आधीपासून विदर्भात कार्यरत आहेत. आमचे एकनाथ शिंदे तिथे आहेत. विजय वडेट्टीवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत, असेही अनिल परब म्हणाले.

 

News English Summary: State Transport Minister Anil Parab has responded aggressively. Anil Parab has said that Chief Minister Uddhav Thackeray is working. He is holding regular meetings from Varsha Bungalow, the official residence of the Chief Minister. You don’t have to walk around the state every time.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray working from home transport minister Anil Parab reply to the oppositions allegations marathi news live latest updates.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x