1 December 2022 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Funds | अरे देवा! लोकं कार खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत, SIP गुंतवणूक वाढीचे कारण काय? Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत
x

MPSC परीक्षा पुढे ढकलली | पण तारीख जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

MPSC Exam, UPSC Exam, competition exam preparation, Marathi News ABP Maza

मुंबई, २ सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.

याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या निर्णयाला एमपीएससीने केवळ दुजोरा दिला आहे. नवीन तारखा जाहीर होतील,अशी अपेक्षा होती. मात्र, तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे.सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्यामुळे अभ्यासाचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत असं MPSC’ची तयारी करणारे विद्यार्थी सुहास कांबळे म्हणाले.

राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल,असे वाटले होते.त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्कारून गाव सोडून पुण्यात परीक्षा देण्यासाठी आलो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात राहणे धोक्याचे वाटत असून नवीन तारखा जाहीर न झाल्याने निराशा झाली आहे. आता पुन्हा नवीन तारखांची वाट पहावी लागणार आहे असं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी महेश चोबे म्हणाले.

 

News English Summary: The MPSC has only confirmed the decision announced by the Chief Minister’s Office. New dates were expected to be announced. However, there is frustration among the students as the dates have not been announced.

News English Title: Competition exam announces postponement but students shows Frustration for not announcing dates Marathi News Live Latest updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x