2 May 2024 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर

Kangana Ranaut

मुंबई, २० सप्टेंबर | गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नसल्याने तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच यावेळी न्यायालयात हजर न राहल्यास अटक वॉरंट काढू, असा सूचक इशारा तिला अंधेरी कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली होती. यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. तसेच हे प्रकरण अन्य न्यायालयात चालवण्यासंदर्भात 1 ऑक्टोबररोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Javed Akhtar Vs Kangana Ranaut, अटक वॉरंटच्या भीतीने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर – Bollywood actress Kangana Ranaut has appeared in the Andheri court of Mumbai :

आज अंधेरी कोर्टात सुनावणी:
जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते. १४ सप्टेंबरला याबाबत सुनावणी झाली असता कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळले होते. तिची कोविड चाचणी झाली. रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील ऍड सिद्दिकी यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली आहे.

काय म्हणाले कंगनाचे वकील:
अशा प्रकारच्या मानहाणी प्रकरणात कंगनाला न्यायालयात येणं आवश्यक नाही. आतापर्यंत पोलिसांनी कोणतेही बयान नोंदवलेले नाही. तसेच आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी प्रतिक्रिया कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Bollywood actress Kangana Ranaut has appeared in the Andheri court of Mumbai.

हॅशटॅग्स

#KanganaRanaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x