29 March 2024 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

आज फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

CM Devendra Fadnavis

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते.

तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही १० नोव्हेंबर २०१४ रोजी अस्तित्त्वात आली होती. ९ नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.

परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच विभागातील शेती, फळबागा, मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्याजवळ रेठरे बुद्रुक येथील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शरद पवार हे तेथूनच उद्यापासून कोकणचा दौरा करणार होते. मात्र पवार यांनी कोकणाचा दौरा सध्या पुढे ढकलला आहे. ते मुंबईत शुक्रवारी दाखल होत असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून समजते.

दरम्यान, सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेने आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडावे, म्हणजे ते भाजपशिवाय अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्यासाठी गंभीर आहेत हे लक्षात येईल. तसे झाले तरच आम्ही दिल्लीत श्रेष्ठींशी बोलू असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. गेले १३ दिवस निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर काँग्रेसची ही पहिली भूमिका समोर आली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x