29 September 2020 3:05 AM
अँप डाउनलोड

अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा

वाॅॅशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅॅटिस यांनी त्याच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या मातांशी सहमत असणारे लोकं महत्वाच्या पदावर हवे असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सदर प्रकरणात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित म्हटलं आहे की, ‘तुमच्या हो ला हो करणारेच संरक्षण मंत्री पदावर ठेवण्याचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे. आणि यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे’. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ पर्यंत मॅॅटिस यांचा कार्यकाळ होता.

सीरियामध्ये आयसिसचा प्रभाव कमी होत असताना २,००० अमेरिकी सैनिक तेथे होते. तर अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सैनिकांना परत बोलावण्याची गोष्ट करत होते. मात्र याबाबत मॅॅटिस यांचे मत पूर्णपणे वेगळे होते. सिरीयामध्ये अमेरिकी सेनेने जास्त काळ तैनात असावे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे असे त्यांना वाटत होते. तसेच सेना तिथेच काही दिवस ठेवण्याच्या बाजूने ते होते. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्तिवादाला मॅॅटिस एक मूर्खपणा समजत होते. नेमका याच विवादातून मॅॅटिस यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Donald Trump(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x