19 April 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

एलआयसी’त २४ वर्षानंतर मेगाभरती; ८००० पदे भरणार

LIC Recruitment, LIC Bharti, LIC Bharti online test, Police Bharti, Police Bharti online paper, Bank Bharti, Bank online test, Bank Recruitment, MPSC Bharti, MPSC Exams, Govexam.in Gov Exam, mahanmk.com, Mahanmk, MPSC Online paper, MPSC Online test, MPSC Online Sarav, UPSC Test, Talathi Bharti, Mahavitaran Bharti, Mahabharti, Mahavitaran Mega Bharti

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेत मरगळ आल्यामुळे रोजगाराच्या संधी घटत असतानाच आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) प्रचंड मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ‘एलआयसी’कडून लवकरच ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमधील तब्बल ८ हजार जागा भरण्यात येतील.

‘एलआयसी’कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जात असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाईल. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून त्याचे वय अठरा ते तीस दरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे.

जवळपास २४ वर्षांनंतर होत असलेल्या असिस्टंट या भरतीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. कुठल्याही विषयामधील पदवीधर हा ही परीक्षा देण्यासाठी पात्र असेल. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची वयोमर्यादा ही १८ ते ३० वर्षे आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सुट देण्यात आलेली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप राहील. प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील. तसेच ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ असून, इच्छूक उमेदवारांना www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि गोव्यातील पणजी ही परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेची तारीख नंतर जाहीर होईल.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x