लॉकडाऊन उठवण्याबाबत तेव्हाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊ: मुख्यमंत्री
मुंबई, ७ एप्रिल: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यांतून या बैठकीत सहभागी झाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. pic.twitter.com/z0Ejq0C7vB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2020
शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
त्यातच किराणा मालाच्या दुकानात चढ्या दरानं माल विकला जातोय, लोकांनाही पोटापाण्यासाठी त्या चढ्या दरानंच माल खरेदी करावा लागतो आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या काळात गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही स्वस्त दरात धान्य मिळणार आहे. ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं चार महत्त्वाचे निर्णय घेतले असून, जनतेला त्यातून दिलासा मिळणार आहे.
ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील निर्णय
- केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.
- कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
- शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.
- कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.
News English Summary: The cabinet meeting was held via video conferencing, considering the risk of the outbreak of the Corona virus. Chief Minister Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Chhagan Bhujbal, Jayant Patil, Eknath Shinde, Aditya Thackeray were present at the conference from the official residence of Varsha. From the Ministry, Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Subhash Desai, Dilip Walse Patil, Nawab Malik, Anil Deshmukh, Rajesh Tope, Prof. Varsha Gaikwad, Dr. Jitendra Awhad, Aslam Shaikh, Adv. Anil Parab was present. Other ministers and state ministers from other districts participated in the meeting.
News English Title: Story Maharashtra a cabinet meeting has been conducted via video conference Chief Minister Spoke about lock down Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा