27 April 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
x

धक्कादायक | NIA'ने जप्त केलेली मर्सिडीज | भाजप नेत्याचं कनेक्शन आणि गाडीसोबत फोटो

Mansukh Hiren, Sachin Sawant, Sachin Vaze

मुंबई, १७ मार्च: मनसुख हिरेन आणि स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

१६ मार्चला एनआयएने MH18BR9095 नंबरची मर्सिडीज कार ताब्यात घेतली. मनसुख हिरन यांनी १७ फेब्रुवारीला हीच कार वापरली असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने ही कार तपासासाठी ताब्यात घेण्यात आली. याच नंबरची मर्सिडीज कार सध्या भाजप नेत्याशी कनेक्शन असल्याचं दाखवत असल्याची चर्चा आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमधून मिळालेल्या माहितीनुसार, MH18BR9095 क्रमांकाची मर्सिडीज कार सारांश भावसार यांच्या फेसबुक फोटोंमध्ये दिसत आहे. भावसार यांच्या एका फोटोत ही कार मागच्या बाजूला असून त्याच फोटो ते त्यांचा मित्र देवेन हेमंत शेळके याच्यासोबत दिसत आहेत. देवेन हेमंत शेळके यांचे फेसबुक प्रोफाईल पाहता ते धुळ्याचे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे आता या कारचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संबंध भाजप पदाधिकाऱ्याशी आहे की काय याबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत.

याशिवाय, काँग्रेसचे सचिन सावंत यांनी ट्वीट केल्यानुसार, एका पत्राच्या आधारे देवेन हेमंत शेळके यांची भाजयुमो ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्याचं आल्याचं म्हटलं जात आहे. १७ ऑक्टोबर २०२० या तारखेचं हे पत्र सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे. भाजयुमो ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीधर जयवंत पाटील यांच्या लेटरहेडवरून हे नियुक्तीपत्र देण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, यावरून या प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची शक्यता असून पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो आहे.

याचबरोबर, देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तसेच, मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

 

News English Summary: An NIA team has seized a Mercedes from Mansukh Hiren and Sachin Waze while investigating the explosives case. However, Congress spokesperson Sachin Sawant has seriously accused the BJP leader of having links with the vehicle.

News English Title: Mansukh Hiren death case photo of BJP leader with Mercedes car Sachin Sawant allegation news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x