5 February 2023 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे?
x

उमेदवार निवडल्यानंतर 48 तासांत गुन्हेगारी रेकॉर्ड द्या | सुप्रीम कोर्टाचे राजकीय पक्षांना आदेश

Supreme Court

नवी दिल्ली, १० ऑगस्ट | सुप्रीम कोर्टाने आज राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वाटा कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निणर्यानुसार, आता सर्वच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निवडल्यानंतर 48 तासाच्या आत गुन्हेगारी रेकार्ड द्यावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सर्वच राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराची माहिती आपल्या संकेतस्थळांवर आणि दोन वर्तमानपत्रात प्रकाशित करावी लागेल. विशेष म्हणजे या आदेशाचा पालन केल्याचा अहवाल 72 तासाच्या आत निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे.

फेब्रुवारी 2020 च्या आदेशात बदल:
सुप्रीम कोर्टाने नवीन आदेशासह आपला पूर्वीचा निर्णयात बदल केले आहे. फेब्रुवारी 2020 च्या पहिल्या निर्णयानुसार, सर्वच पक्षांना उमेदवार निवडल्यानंतर 48 तासांच्या आत किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तारखेच्या दोन आठवड्यांपूर्वी उमेदवारांचा संपूर्ण तपशील द्यावा लागत होता. परंतु, गुन्हेगारांना राजकारणात प्रवेश आणि निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी विधिमंडळ काही करेल अशी शक्यता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आली होती याचिका:
सदरील प्रकरणात अॅड. ब्रजेश सिंह यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एक याचिका दाखल केली होती. दरम्यान, सिंह यांनी आपल्या याचिकेत बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख केला नाही त्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Supreme court of India order on political parties criminal candidates records news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x