15 December 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Heavy Rain Marathwada Flood | अतिवृष्टीने शेतकरी संकटात | शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडू - फडणवीस

Heavy Rain Marathwada Flood

हिंगोली , ०२ ऑक्टोबर | हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची (Heavy Rain Marathwada Flood) पाहणी करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर आज हिंगोली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला कनेरगावनाका त्यानंतर आडगाव येथे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Heavy Rain Marathwada Flood. Devendra Fadnavis and Pravin Darekar visited Hingoli today to inspect the heavy rains in Hingoli district. At this time, he initially inspected the damage at Kanergaonkanaka and then at Adgaon and interacted with the farmers :

यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. एकीकडे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकवर मोठे संकट आहे. दुसरीकडे शासनाकडून ऑनलाईन माहिती भरा, विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करा असे सांगत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत त्यांनी काय करायचे. शासनाने व विमा कंपनीने विम्याचे नियमच कठीण केले त्यामुळे या सरकार कडून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आता तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहे. जास्तीत जास्त मदत करण्यासाठी शासनाला प्रवृत्त करा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून विमा मिळवून देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

विमाकंपन्या केवळ कागदीघोडे नाचवितात:
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाब विचारला. शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. विमा कंपन्या केवळ कागदीघोडे नाचविते आहेत. शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यावर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Heavy Rain Marathwada Flood opposition leader Fadnavis visited Hingoli district.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x