29 March 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

त्रिपुरा मध्ये एकूण ६५% मतदान, भाजप आणि सीपीएम मध्ये लढत.

त्रिपुरा : डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरा राज्यात आज विधानसभेसाठीच्या मतदानात ६५% मतदान झाले. विद्यमान माणिक सरकार आणि भाजप मध्ये थेट लढत आहे.

त्रिपुरा मध्ये कित्येक वर्ष माणिक सरकार चे राज्य असून भाजपने ही आक्रमक प्रचाराने उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रचाराचा धुरळा उडवत डाव्यांना हा विजय सहज नसल्याचे सूचित केले आहे.

उत्तर पूर्वेकडील एकूण ७ राज्यांपैकी त्रिपुराची पहिली निवडणूक पार पडत आहे. आज संध्याकाळ पर्यंत एकूण ६५% टक्के मतदानाची नोंदणी झाली असून हे विधानसभा निवडणूक कम्युनिस्ट पक्ष पुन्हा जिंकणार की भाजप सरकार स्थापन करणार ते तीन मार्चलाच कळू शकेल. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली नसून दोन्ही पक्ष स्वतंत्रपने निवडणूक लढवत आहेत. तिन्ही राज्यांचे म्हणजे मेघालय, नागालँड आणि त्रिपुराचे निकाल एकाच दिवशी म्हणजे ३ मार्चला जाहीर होणार आहेत.

त्रिपुरामध्ये एकूण २५ लाख ७९ हजार मतदार असून, एकूण ६० जागांसाठी होत असलेल्या जागांसाठी २९७ उमेदवार रिंगणात आहेत.

हॅशटॅग्स

#Tripura Election(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x